शॉप / गुमास्ता लायसेन्स (Shop Act Registration) :
दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतीगृहे, भोजनगृहे, थिएटर्स व सार्वजनिक करमणुकीची अथवा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणारे सेवक गुमास्ता या संज्ञेखाली मोडतात. या सेवकांसंबंधी व त्यांच्या कामासंबंधी शासनाने गुमास्ता अधिनियम संमत केलेले आहेत.जगातील बहुतेक देशांत एकूण कामगारवर्गाची स्थिती औद्योगिक क्रांतीपूर्वी हलाखीचीच होती, असा इतिहास आढळतो. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्गासंबंधीच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल झाले व कामगारवर्गाची स्थिती झपाट्याने सुधारू लागली, त्यांच्यासाठी विविध कायदे निर्माण झाले. फॅक्टरी अधिनियमांन्वये लहान कारखान्यांतील सेवकांनाही त्यांचा लाभ मिळाला.
फॅक्टरीखाली न मोडणाऱ्या परंतु वरील संस्थांमधील सेवकांनाही या सुधारणांचा फायदा मिळावा, म्हणून गुमास्ता अधिनियमांची तरतूद बहुतेक ठिकाणी अमलात येऊ लागली. इंग्लंडमध्ये प्रथम अशा स्वरूपाचा अधिनियम १८८६ मध्ये संमत झाला, तर भारतात प्रथम मुंबई सरकारने १९३९ साली याबाबत अधिनियम केला. या अधिनियमातील दोष दूर करून १९४८ चा शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स अॅक्ट संमत करण्यात आला. त्यातही अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या.
१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २६ ने काही नवीन कलमे घातली व आणखी काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करून हा अधिनियम अधिक कडक केला. असे असले, तरी १९४८ च्या अधिनियमाची संरचना तशीच कायम आहे व त्याच नावाने तो अजूनही संबोधला जातो. किमान दंडाची मर्यादा हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. इतर बहुतेक राज्यांत याच धर्तीवर अधिनियम करण्यात आले आहेत. या अधिनियमांचे उद्देश साध्य करण्यासाठी राज्य सरकारला नियम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
या अधिनियमांमध्ये साधारणतः वरील संस्थांत काम करणाऱ्या सेवकांचे हक्क व त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणाऱ्या नियमांची तरतूद केलेली आहे. उदा., सेवकांच्या कामाची व विश्रांतीची वेळ, साप्ताहिक सुटी, वर्षाकाठी त्यांना द्यावयाची पगारी रजा, रोजचे तसेच साप्ताहिक कामाचे तास, जादा कामाचे तास व त्याबद्दलचे वेतन, लहान मुलांच्या व स्त्रियांच्या बाबतीत वेळेचे व कामाच्या स्वरूपाचे बंधन, संस्था उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांवरील बंधन, काम करण्याच्या स्थानातील हवामान यांसारख्या आवश्यक गोष्टींविषयी दक्षता इ. सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्या कायद्यामध्येच यंत्रणेची व उपायांची योजना केली आहे.
महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करताना व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय परवाना होय. कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात या परवान्याने होते. दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यावसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी हा परवाना महत्त्वाचा ठरतो.
परवान्याचे महत्त्व :
व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर/निविदा भरते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे असते. त्याचप्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे, दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय परावाना महत्त्वाचा ठरतो. सदर परवानाधारकांनाच मूल्यवर्धित कर क्रमांक काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते, परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.
आवश्यक कागदपत्रे :
जेथे व्यवसाय सुरू आहे किंवा करावयाचा आहे. त्या ठिकाणचे/जागेवरील घेतलेले वीजदेयक/भ्रमणध्वनी देयक.
जागा स्व-मालकीची असले तर जागेचा उतारा.
जागा भाडेतत्त्वावर असल्यास १०० रुपये स्टॅम्पवर मालकाचे संमतीपत्र, वीजदेयक, भ्रमणध्वनी देयक नसल्यास संमतीपत्रात जागेचे ठिकाण पूर्ण नोंदवावे.
अर्जदाराचा फोटो
आधार कार्ड
पॅन कार्ड
बोर्ड फोटो (दुकानाचा फोटो)
प्रक्रिया :उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्तावयोग्य चलन व फी जमा करून सादर करावा.
प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान नऊ दिवसात व्यवसाय परवाना प्राप्त होतो.
सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.
व्यवसाय परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.
नूतनीकरण करताना मूळ परवाना जवळ असावा. या परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो. हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते.
आठवडय़ातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यावसायिकाला असतो.
नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा :
उद्यम नोंदणीसाठी आम्हाला 9404104242 या क्रमांकावर Whatsapp करा.
आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला उद्यम नोंदणी प्रकार आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी मार्गदर्शन करु.
दिलेल्या क्रमांकावर किंवा आमच्या ई-मेल वर तुमची व्यवसायिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवा.
आम्ही तुमचा अर्ज उद्यम च्या अधिकृत वेबसाईटवर दाखल करू.
तुम्हाला प्रमाणपत्र किंवा परवाना तुमच्या Whatsapp किंवा ई-मेलवर मिळेल.